प्रतिनिधी / बेळगाव
महाद्वार रोड येथील आधार मल्टीपर्पज सौहार्द सहकारी नियमित या संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक मावळते चेअरमन भोमाणी बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. चेअरमनपदी सुभाष देसाई तर व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब चोपडे यांची निवड करण्यात आली.
संचालकपदी संस्थापक प्रदीप अष्टेकर, अनंत लाड, भोमाणी बिर्जे, अनंत पाटील, रामा बाचुळकर, सुनील चौगुले, विकास मजुकर, महादेव ठोकणेकर, बाळकृष्ण दंडगलकर, अशोक अमरगोळ, कल्पना मोहिते, पूजा गुरव यांची निवड करण्यात आली आहे. व्यवस्थापक के. बी. संकण्णावर यांनी स्वागत केले. याप्रसंगी नव्या पदाधिकाऱयांचा सत्कार करण्यात आला. आपल्या कारकिर्दीत संस्थेची उत्तम प्रगती करण्याचे आश्वासन नव्या कार्यकारिणीने दिले.