मुंबई/प्रतिनिधी
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आज ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने मंदिरे उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनावर त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण कोरोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो, अशा शब्दात भाजपला सुनावलं होतं. पण आता भाजपचे नेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री काय बोलले याच्यावर मी काहीही बोलणार नाही. समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं. मग आम्हाला सांगावं”, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला.