मास्को
– रशिया देश इराणला मदतीसाठी पुढे आला आहे. रशिया येणाऱया काळात इराणला आधुनिक उपग्रहाचा पुरवठा करणार आहे, असे समजते. मध्य आशियाच्या सर्वदूर होणारे संभाव्य सैनिकी हल्ले रोखण्यासाठी यांचा वापर होईल, ज्याचा फायदा इराणला भविष्यात होऊ शकेल. योजनेनुसार रशियाने निर्मित केलेला कॅनोपस-व्ही उपग्रह इराणला दिला जाणार आहे. आधुनिक अशा उपग्रहात उत्तम गुणवत्तेचा कॅमेरा असेल. उपग्रहामार्फत पर्शियन गल्फ तेल शुद्धीकरण केंदे व इस्रायलच्या सैनिकी तळांवर तसेच इराकच्या सैनिकांच्या राहण्याच्या जागा (अमेरिका) यावर कायमस्वरुपी लक्ष ठेवणार असून त्यामार्फत सातत्याने ताजी माहिती इराणला कळू शकणार आहे. रशियातील तज्ञांनी इराणला भेट देऊन उपग्रह चालवण्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले असल्याचेही सांगितले जाते. उपग्रहाची कार्यप्रणालीबाबतची माहिती देण्यात आली आहे. तेहरानच्या पश्चिमेला कराजजवळ नव्या उपग्रहाची व्यवस्था करण्यात आली आहे.