प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातल्याने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. आनंदनगर दुसरा क्रॉस येथील नागरिकांनी वर्गणी जमा करून स्वखर्चाने घरोघरी सॅनिटायझरची फवारणी केली. या उपक्रमामुळे स्थानिक रहिवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
शासनस्तरावर सर्वतोपरी उपाय केले जात असले तरी आपलाही यात खारीचा वाटा असावा, या हेतूने येथील नागरिकांनी एकत्रित येत घरोघरी जाऊन अंगणात व परिसरात सॅनिटायझरची फवारणी केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गल्लीतील नागरिकांनीच पुढाकार घेऊन चारचाकी वाहनाद्वारे फवारणीची व्यवस्था केली होती. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविला.
याप्रसंगी गल्लीतील मल्लाप्पा कुंडेकर, बाळू तमूचे, अशोक खुबसद, महेश करटे, संतोष चव्हाण, अनिल जुवेकर, महेश मोहिते, अशोक सायनेकर, प्रमोद पोतदार, मनोज पवार, संतोष पवार, संतोष राणे, राहुल पत्तार, शशी हणमगौड, चेतन पाटील, मंजुनाथ रायबागी, अमित कोळेकर आदींचे सहकार्य लाभले.