शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
पाटील गल्ली, आनंदनगर-वडगाव येथील एक वृध्द व त्याची मुलगी गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. या संबंधी गुरुवारी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
भीमाप्पा बसाप्पा हडपद (वय 70) त्याची मुलगी द्यामव्वा भीमाप्पा हडपद (वय 35) अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे मुळचे मारडगी (ता. जि. धारवाड) चे. सध्या पाटील गल्ली, आनंदनगर-वडगाव येथे त्यांचे वास्तव्य होते. भीमाप्पाचा मुलगा मल्लाप्पा (वय 32) हा मिठाई दुकानात काम करतो.
दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते रात्री 11.30 यावेळेत भीमाप्पा व त्याची मुलगी द्यामव्वा बेपत्ता झाले आहेत. या दोघा जणांविषयी कोणाला माहिती मिळाल्यास शहापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार पुढील तपास करीत आहेत.