वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सीरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडियाने भारतात कोविड-19 च्या संभाव्य लसीचे उत्पादन सुरू केले आहे. सीरम इन्स्टीटय़ूट लसनिर्मितीप्रकरणी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. सीरम इन्स्टीटय़ूट ही ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लस प्रकल्पात भागीदार असून भारतात या लसीची चाचणी करत आहे.
संख्येच्या दृष्टीकोनातून जगातील सर्वात मोठी लसउत्पादन कंपनी सीरम इन्स्टीटय़ूट कोडागेनिक्सच्या सीडीएक्स-005 ला विकसित करणार असून ती इंजेक्शनऐवजी अंतर्गत स्वरुपात दिली जाणार आहे.
सीरम इन्स्टीट्य़ू कोरोना विषाणूसाठी लसीवर काम करत असून ऍस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डा विद्यापीठाकडून संभाव्य स्वरुपात मोठय़ा प्रमाणावरील उत्पादनात सामील आहे. याकरता लसीचे डोस जगभरात चाचणीसाठी पाठविले जात आहेत. याचबरोबर मॉडर्ना, फायजर आणि ऍस्ट्राजेनेका पीएलसीचे लसप्रकल्प अंतिम टप्प्यातील चाचण्यांमध्ये आहेत.
पुण्यातील सीरम इन्स्टीटय़ूटने यापूर्वीच ऑक्सफोर्डच्या प्रकल्पात भागीदारी केली आहे. ऑक्सफोर्डची लस यशस्वी ठरल्यास भारतात त्याच्या उपलब्धतेत कुठलीच अडचण येणार नाही. या कंपनीने ऍस्ट्राजेनेकासोबत देखील भागीदारी केली आहे.
भारत अनेकांच्या संपर्कात
भारताची एक लस क्लीनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यात आहे. सरकार सीरम इन्स्टीटय़ूट समवेत अनेक कंपन्यांच्या संपर्कात असून अधिकाधिक डोस प्राप्त करू इच्छिते. आयसीएमआर आणि भारत बायोटेककडून विकसित केली जाणारी कोवॅक्सीन आणि जायड्स कॅडिलाची ‘झायकोव-डी’ चाचणीत यशस्वी ठरल्यास त्याचीही ऑर्डर दिली जाऊ शकते अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.