केएससीए सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागिय क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने केएससीए सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत हुबळी येथे आनंद क्रिकेट अकादमी संघाने टॅलेंट स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाचा 6 गडय़ानी पराभव करून 4 गुण मिळविले. 99 धावा करणाऱया नागेंद्र पाटील व 23 धावात 5 गडी बाद करणाऱया केतज कोल्हापुरे यांनी लक्षवेधी प्रदर्शन केले.
टॅलेंट स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने 25.5 षटकात सर्व बाद 187 धावा केल्या, त्यात संजय एस. एम. ने 68 चेंडूत 102 धावा करून स्पर्धेतील पाचवे शतक झळकाविले. अनंत आर एन ने 22, प्रताप के. ने 17 तर करणकुमारने 11 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे केतज कोल्हापुरेने 23 धावात 5, नंदकुमार मलतवाडकरने 23 धावात 3, संम्मीद बी ने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 23.3 षटकात 4 बाद 188 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. त्यात नागेंद्र पाटीलने 1 षटकार, 18 चौकारासह 99, रूद्रगौडा पाटीलने 43, केतज कोल्हापुरेने 1 षटकार, 2 चौकारासह नाबाद 24 तर नंदकुमार मलतवाडकरने नाबाद 17 धावा केल्या. टॅलेंटतर्फे करणकुमार एस. ने 49 धावात 2 तर संदीप जी. व शरन टी. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
कोरोनामुळे सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा रद्द
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागीय क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने केएससीए धारवाड सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा कोरोनाच्या प्रसारामुळे उर्वरित सामने रद्द करण्यात आले आहेत, असे केएससीएचे व्यवस्थापक महावीर यांनी कळविले आहे.