अभयकुमार करडी चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट कोचिंग अकादमी आयोजित अभयकुमार करडी स्मृती चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनाच्या सामन्यात आनंद अकादमी संघाने फास्ट क्रिकेट अकादमी संघाचा 8 गडय़ांनी पराभव करून विजयी सलामी दिली. सुप्रित गेंजी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
भुतरामहट्टी येथील भगवान महावीर जैन स्कूल मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन चंद्रकांत कडोलकर, सुरज नाईक, जय पावशे, नंदकुमार मलतवाडकर, आनंद करडी, ईश्वर ईटगी, नागेश सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सामन्यात फास्ट क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 26 षटकात सर्वबाद 88 धावा केल्या. सुजय कोरवारने 4 चौकारासह 29 तर आकाश कम्मारने 15 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे सुप्रित गेंजीने 18 धावात 3, लाभा वेर्णेकरने 16 धावात 2, तनिष्क जैनने 18 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमी संघाने 15 षटकात 2 बाद 90 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. त्यात लाभा वेर्णेकरने 11 चौकारासह 57, नील पोवारने 12 धावा केल्या. फास्ट अकादमीतर्फे श्रेयस एन. व दक्ष यांनी प्रत्येकी 1 गडी बाद
केला.