क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमीने सिद्धारूढ स्वामी हुबळी संघाचा 264 धावानी, टॅलेन्स स्पोर्ट्स हुबळीने जानोपॅन्थर गदग संघाचा 134 धावांनी तर स्पोर्ट्स अकादमी गदग संघाने बीडीके हुबळी सी संघाचा 29 धावांनी पराभव करून प्रत्येकी चार गुण मिळविले. अभिषेक देसाई व नागेंद्र पाटील आनंद अकादमी, संजय एस. एम. हुबळी, शिवा करडी गदग यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव मैदानावर आनंद अकादमीने 50 षटकात 8 बाद 407 धावा केल्या. नागेंद्र पाटील 1 षटकार 32 चौकारासह 154 तर अभिषेक देसाईने 12 षटकार 2 चौकारासह 104 धावा करून शतके झळकविली. राहुल नाईकने 30, झिशान सय्यद व सचिन शिंदे यांनी प्रत्येकी 25, केतज कोल्हापुरेने 17 तर किसन मेघराजने 13 धावा केल्या. सिद्धारूढ स्वामी हुबळीतर्फे पवनकुमार के. ने 61 धावात 3, यल्लाप्पा काळेने 60 धावात 2 तर अभिषेक बेलकाई, दयानंद डोंगी व प्रकाश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्री सिद्धारूढ स्वामी हुबळी संघाचा डाव 31 षटकात 143 धावात आटोपला. त्यात सुरेश चंद्राने 42, अभि देशपांडेने 27, संतोषने 22, विष्णूने 21 धावा केल्या. आनंदतर्फे झिशान सय्यदने 3 धावात 3, सचिन शिंदेने 37 धावात 3, केतज कोल्हापुरेने 2 तर वाहीद व ओंकार देशपांडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात टॅलेंट स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 300 धावा केल्या. त्यात संजय एस. एम. ने 79, अंकृतने 57, रवीकुमार साकरीने 37, अझर नदाफने 32 तर सचिनने 18 धावा केल्या. गदगतर्फे संदीप पै ने 40 धावात 3, प्रसाद कलबुर्गीने 48 धावात 3, तर माणी, साईकुमार, अभिषेक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना जानो पॅन्थर गदग संघाचा डाव 32.1 षटकात 166 धावात आटोपला. त्यात रियाज कोटबाळने 35, संदीप पै ने 23, साई प्रवीणने नाबाद 19, प्रसाद कलबुर्गीने 18 धावा केल्या. टॅलेन्टतर्फे भार्गवर नाडगेरने 24 धावात 3, रवीकुमारने 2, तर श्रवण, आनंत, श्रवणन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
केएससीए हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्पोर्ट्स अकादमी गदग संघाने प्रथम फलंदाजी करताना 32.1 षटकात सर्वबाद 185 धावा केल्या. त्यात किरण असंगीने 75, अल्तमशने 71, शिवा करडीने 39, शांतगौडा पाटीलने 19 धावा केल्या. बीडीके हुबळीतर्फे दिवाण जालगारने 38 धावात 3, किरण गौडर व सौरव सामंत यांनी प्रत्येकी 2, तर पवन, शिवानंद, भूवन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बीडीके सी संघाचा डाव 49.4 षटकात सर्वबाद 156 धावात आटोपला. त्यात सौरव सामंतने 34, अब्दुल देवनमने 22, शिवानंद नायकने 20 धावा केल्या. गदगतर्फे शिवा करडीने 18 धावात 3, शानगौडर पाटीलने 45 धावात 3, तर अस्लम व सचिन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.