दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धा
बेळगाव/ क्रीडा प्रतिनिधी
दीपक नार्वेकर पुरस्कृत बोर्ड ऑफ पॅरेन्ट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित बीपीसी लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद चॅलेंजर्स संघाने विश्रृत स्ट्रायकर्स संघाचा 3 गडय़ांनी तर साईराज वॉरियर्स संघाने मिलन वॉरियर्स संघाचा 58 धावांनी पराभव केला. जेनित मुडबागील (आनंद चॅलेंजर्स) आकाश असलकर (साईराज) सामनावीरचे मानकरी ठरले.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात विश्रृत स्ट्रायकर्स संघाने 25 षटकांत 9 बाद 149 धावा केल्या. दीपक राक्षेने 33, सिद्धार्थ गोदवाणीने 32, हार्दिक काटनेने 22, कीर्तन बेकवाडकरने 11 धावा केल्या. आनंदतर्फे अनिकेत लोहारने 23 धावांत 3, ज्ञानेश होनगेकर, कैफ मुल्ला, राहुल बजंत्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. त्यानंतर आनंद चॅलेंजर्सने 24.3 षटकांत 7 बाद 155 धावा जमवित सामना 3 गडय़ांनी जिंकला. मुडबागीलने 2 षटकार, 8 चौकारांसह नाबाद 81 धावांची खेळी केली. त्याला रयान सनदीने नाबाद 14 धावा करून सुरेख साथ दिली. विश्रृत स्ट्रायकर्सतर्फे हार्दिक काटनेने 25 धावांत 2, रोहित ढवळेने 32 धावांत 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने 23 षटकांत 7 बाद 189 धावा केल्या. पण मिलन वॉरियर्सने षटके संपविण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतल्याने त्यांना 20 धावांचा दंड करण्यात आला. त्यामुळे साईराजचे 23 षटकात 7 बाद 209 धावा झाल्या. रोहित पाटीलने 44, वैभव कुरीबागीने व नंदन शिंदे यांनी प्रत्येकी 34 धावा केल्या. मिलन वॉरियर्सतर्फे नागदीप होनगलने 31 धावांत 2, ओम रूपचंदानी साई पारिशवाड, पवन जालगारने प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर मिलन वॉरियर्सला 23 षटकांत 5 बाद 151 धावांच जमविता आल्या. सुदर्शन भावीकट्टीने 47, साईल पारिशवाड व नयन काबाडीने प्रत्येकी 21, ओम रूपचंदानीने 20 धावा केल्या. साईराज वॉरियर्सच्या आकाश असलकरने 26 धावांत 4 तर समेद बेल्लदने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते व चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष सतीश तेंडोलकर, देवदत्त शटवाणी, नागेश देसाई, नासीर सनदी, स्वप्नील भडाळे रिया नार्वेकर, गजानन फगरे, विक्रम देसाई यांच्या हस्ते अष्टपैलू जेनीत मुडबागील व प्रकाश असलकर यांना सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सोमवारचे सामने : 1) गणेश हुबळी टायगर्स वि. दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब, सकाळी 9 वाजता., 2) मिलन वॉरियर्स वि. विश्रृत स्टायकर्स, दुपारी 1.30 वाजता.