केएससीए सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी बेळगाव ब संघाने क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका धारवाड ब संघाचा 205 धावांनी, हुबळी क्रिकेट अकादमी ब संघाने स्पोर्ट्स अकादमी गदग संघाचा 65 धावांनी तर भटकळ स्पोर्ट्स क्लब संघाने टॅलेंट स्पोर्ट्स हुबळी संघाचा 194 धावांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. महंमद आसीम के. (भटकळ), झिशानअली सय्यद (आनंद अकादमी), मनिकांत बुकीटगार यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
बेळगाव केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी ब संघाने 50 षटकात 9 बाद 364 धावा केल्या. झिशानअली सय्यदने शतकी खेळी करताना 11 षटकार, 8 चौकारासह 51 चेंडूत नाबाद 123 धावा फटकावल्या. केतज कोल्हापुरेने 3 षटकार, 3 चौकारासह 61, ओंकार देशपांडेने 6 चौकारासह 81, पियूष गोहिलोतने 20 तर नागेंद्र पाटीलने 12 धावा केल्या. सीसीके धारवाडतर्फे संतोष लमाणीने 37 धावात 3, अभय कुलकर्णी व श्रेयस मुर्डेश्वर यांनी प्रत्येकी 2 तर यशवंत पत्तार, राजा इरानीने प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका ब संघाने 50 षटकात 8 बाद 159 धावाच केल्या. त्यात अभय कुलकर्णीने 7 चौकारासह 56, संतोष लमाणीने 28, बी. अखीलने 23, अजय शिवालयने 14 धावा केल्या. आनंद क्रिकेट अकादमीतर्फे केतज कोल्हापुरेने 34 धावात 3, सचिन मांगलेने 23 धावात 2, झिशानअली सय्यद, अभिषेक देसाई, किसन मेघराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
केएससीए हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात भटकळ स्पोर्ट्स क्लब संघाने 50 षटकात 6 बाद 262 धावा केल्या. महंमद अस्लम के. याने 13 चौकारासह नाबाद 99, अब्दुल बाकीने 1 षटकार, 11 चौकारासह 61, अब्दुल्लाने 37, महंमद झियानने 19, इजाज अहमदने 17, हयाद शेखने 14 धावा केल्या. टॅलेंट हुबळीतर्फे विनय पाटीलने 25 धावात 2, किरणकुमार साक्रीने 51 धावात 2, तर श्रवण टी, शंकरगौडा बी. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना टॅलेंट स्पोर्ट्स हुबळी संघाचा डाव 21 षटकात 71 धावात आटोपला. भटकळतर्फे महंमद इम्रानने 17 धावात 7 गडी बाद करीत निम्म्याहून अधिक संघ गारद केला. ईजाज अहमद, अब्दुल हमिद, महंमद अस्लम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
आरआयएस हुबळी मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी क्रिकेट अकादमी संघाने 38 षटकात सर्व बाद 226 धावा करीत मनिकांत बुकीटगारने 16 चौकारासह 71, मनिष एम. एस.ने 2 षटकार, 11 चौकारासह 68, अनमोल पाटदने 30, साहील सूर्यवंशीने 17 धावा केल्या. स्पोर्ट्स अकादमी गदगतर्फे शिवराज कर्डेने 37 धावात 4, शांतगौडा पाटीलने 32 धावात 4 तर कार्तिकेय, सचिन पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्पोर्ट्स अकादमी गदग संघाचा डाव 36.4 षटकात 161 धावात आटोपला. शांतगौडा पाटीलने 2 षटकार, 5 चौकारासह 39, शुभम जैनने 6 चौकारासह 37, अल्पमश खाजाने 29, चिन्मय कुलकर्णीने 21, शिवराज खर्डेने 15 धावा केल्या. हुबळी क्रिकेट अकादमीतर्फे मनिकांत बुकीटगारने 18 धावात 3, सुजल पाटीलने 15 धावात 2, पुनीत बासवाने 30 धावात 2, विशाल राठोड, बी. विन्सेंट, मनिष एम. एस. यांनी एकेक बळी टिपला.