पाच रविवारी 5 वाजता 5 मीनिटे करणार फोगिंग
प्रतिनिधी /पणजी
राजधानीतील वाढत्या डेंग्यू प्रकरणा विरुद्ध आम आदमी पक्ष अनोखी मोहीम राबविणार असून पुढील पाच रविवारी प्रत्येक संध्याकाळी 5 वाजता 5 मिनिटांसाठी फॉगिंग एक्सरसाइज करण्यात येणार आहे. त्याद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता करण्यात येणार आहे, आप नेते वाल्मिकी नाईक आणि स्वयंसेवकांनी रविवारी फॉगिंग मशीन तैनात करून सदर मोहीम राबवली.
5 रविवार – संध्याकाळी 5 वाजता 5 मिनिटे’’ या मोहिमेची सुरुवात करताना नाईक यांनी या मोहिमेची संकल्पना सांगितली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वप्रथम ही मोहीम प्रभावीपणे यशस्वी केली. त्यामुळे डेंग्युमुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यात आला.
रविवारी सांत इनेज प्रभाग क्रमांक 24 मध्ये संध्याकाळी फॉगिंग मोहिमेला सुरुवात झाली, या प्रभागात कचरा, पाणी साचल्याने अस्वच्छता दिसून आली. मनपा स्वच्छतेकडे लक्ष देण्याता अपयशी ठरली असल्याची खंत यावेळी स्थानिकांनी व्यक्त केली. तसेच आपच्या या मोहिमेचे कौतुक केले.
कोविड साथीच्या आजारामुळे नागरिक आधीच भयभित असल्याचे सांगत नाईक म्हणाले की डेंग्यूमुळे शहरातील रहिवाशांमध्ये आणखी भीती निर्माण होत आहे तसेच या रोगामध्ये कोविड सारखीच लक्षणे असल्याने नागरिक घाबरत असल्याचे ते म्हणाले.
राजधानी शहर असूनही पणजी डेंग्यूचा हॉटस्पॉट बनली आहे. त्यावरून भाजपची ’स्वच्छ भारत’ मोहीम पणजीमध्ये अपयशी ठरली असल्याचे सिद्ध होत आहे, असे नाईक म्हणाले. म्हणूनच आम्ही अशाप्रकारची अनोखी मोहीम सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.