प्रतिनीधी / पणजी
आम आदमी पार्टीचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे आणि आपच्या उमेदवार प्रतिमा कुतीन्हो यांनी मंगळवारी म्हापसा आणि नावेली मधून विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले.म्हापसेकर म्हपसाला ग्रासलेल्या भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार अस ते म्हणाले, “शहर आणि तेथील रहिवासी कोणत्याही सोयीसुविधां शिवाय जगत आहेत मात्र दुसरीकडे नगरसेवकांची भरभराट झाली असे ते म्हणाले
“पक्षाच्या तरुण-आणि महिला-केंद्रित धोरणांमुळे प्रेरित होऊन अनेक म्हापसा तरुण आणि महिला आपमध्ये सामील झाले. सहा वर्षांत ‘आप’ने दिल्लीचा संपूर्ण कायापालट केला आहे.
जर ‘आप’ने राज्यात सत्ता जिंकली तर आम्ही आमची सर्व आश्वासने पूर्ण करू” , अस ते म्हणाले
“गेल्या काही वर्षांत, सामान्य व्यक्तीच्या समस्या सोडवणारा ‘आप’ हा एकमेव पक्ष आहे. तर इतर नेते पक्ष बदलण्याची घाई करत आहेत. भाजपचा जाहीरनामा बघा, गेल्या काही वर्षांत तोच आहे. आणि ते या निवडणुकीतही नेमका तोच जाहीरनामा प्रसिद्ध करतील. मी लोकांना विनंती करतो की, ‘आप’ला बदल घडवून आणण्याची संधी द्यावी”.
ही निवडणूक सोपी नाही. नावेलि मध्ये यावेळी विशेष उमेदवार आणि सामान्य उमेदवार यांच्यात लढत आहे. मी नावेली लोकांसाठी अथक काम केले आहे आणि यावेळी लोक आप ला साथ देतील असा विश्वास प्रतिमाने व्यक्त केला प्रतिमा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यास नावेली मधील कचरा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.“नावेली रस्त्याच्या कडेला सर्वत्र दिसत असलेल्या कचऱ्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे . गेल्या काही वर्षांपासून लोकसंख्या वाढली आहे परिणामी निर्माण होणाऱ्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य यंत्रणा नसल्यामुळे ही समस्या पंचायतींसाठी तसेच रहिवाशांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे.
“नवेलीचे रहिवासी भाजप आणि काँग्रेसला कंटाळले आहेत. ते भ्रष्टाचार आणि घराणेशाहीमुळे कंटाळले आहेत गोव्यात नोकऱ्या निर्माण झाल्या नाही . आप प्रत्येक घराला नोकऱ्या आणि त्यांना रोजगार मिळेपर्यंत मासिक बेरोजगारी भत्ता देईल. खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांपैकी 80 टक्के स्थानिक रहिवाशांसाठी राखीव असतील आणि सरकारी नोकऱ्या गुणवत्तेवर दिल्या जातील.”अस प्रतिमाने सांगितले.