येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय
प्रतिनिधी /म्हापसा
शिवोलीतील जनतेने सध्या तरी आपल्याबाबत संभ्रमात पडण्याची गरज नाही. सध्यातरी मी शिवोलीचा आमदार आहे. मी निवडणूक लढविणे हे क्रमाने ठरते आहे. येणाऱया दोन दिवसात आपण आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. काही असू द्या शेवटी मी शिवोलीतून निवडणूक रिंगणात उतरणारच आहे. आता तो पक्ष कोणता ते दोन दिवसात स्पष्ट करू. अशा गोष्टी मुहुर्त पाहून कराव्या लागतात. मला तो योग आला नव्हता. येत्या दोन दिवसात तो मुहूर्त निश्चित झाल्याने आपण निवडणूक रिंगणात उतरणार हे नक्की झाल्याची माहिती विनोद पालयेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गोव्याच्या राजकारणात स्वतःच्या हिंमतीवर आलो
शिवोलीचे सध्या पालयेकर आमदार असून त्यांची भूमिका काय याबाबत पत्रकारांनी त्यांना घेरले असता पालयेकरांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, गोवा फॉरवर्डची सध्या शिवोलीत निशाणी नाही. गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई& यांनी आपला घात केला असे म्हणायचे आहे काय या प्रश्नाला उत्तर देताना पालयेकर म्हणाले की, मी कुणालाही त्याचा दोष देत नाही आणि आपला तो स्वभावही नाही. एक म्हणजे आपण गोव्याच्या राजकारणात आलो तो स्वतःच्या हिंमतीवर आलो आहे. स्वतःची व्यक्तीशः मते आहे त्यावर आलो आहे. गोवा फॉरवर्डचा आपल्यास पाठिंबा दिला होता. आपले बंधू उदय पालयेकर दिवंगत झाले. त्यांनी यापूर्वी कामे केली आहे. आम्ही 20 वर्षे कामे केली. स्व. मनोहर पर्रीकरांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला मंत्रीपदही बहाल केले. त्या आधारे शिवोलीत अफाट विकासकामे केली याचे एकच उद्दीष्ट डोळय़ासमोर ठेवून या मतदारसंघाची सेवा करू आणि त्या काळात आपल्याकडून या मतदारसंघात अरिष्ठ असे काही घडले नाही. जे मतदारसंघाच्या अहितासाठी कारणीभूत ठरले. प्रामाणिक मतदार आहे त्यांचा आपल्यास सदैव पाठिंबा आहे असे ते म्हणाले. आपण प्रत्येक मतदारास भेटण्याचा प्रयत्न करणार आहे.
शेवटी विजय एकटय़ाचाच होईल
डिलायला लोबोचा आपल्यास काहीच फरक पडणार नाही. तिला आपल्या शुभेच्छा आहे. जे कोणी या मतदारसंघात राहिले त्यांना आपण शुभेच्छा देतो. 10 जण राहिले तरी विजय एकटय़ाचाच होणार आहे. शिवोलीचा इतिहास आहे की शिवोलीचा उमेदवार निवडून आला आहे. बाहेरच्या उमेदवारास अद्याप शिवोलीत स्वीकार केले नाही. भाजपात जाण्याबाबतही कसे काही नाही. येणाऱया दोन दिवसात आपण अंतिम निर्णय घेणार असल्याचे विनोद पालेयकर यांनी सांगितले.