सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरात आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहचविण्यासाठी सातारा पालिकेने अहोरात्र चालणारी नवीन हेल्पलाईन सुरू केली आहे. खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी या हेल्पलाईनच्या कामात पुढाकार घेतला.
02162-232686-101 ही नवीन हेल्पलाईन सातारा पालिकेने सुरू केली आहे. या हेल्पलाईनची माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात नमूद आहे की, सध्या सातारा शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. दरड कोसळणे, रस्ता खचणे अथवा वाहून जाणे, वृक्ष उन्मळून पडणे, धोकादायक इमारत कोसळणे आदी स्वरूपाच्या आपत्कालीन घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी आपत्ती घडल्यास नागरिकांनी वरील हेल्पलाईनवर संपर्क साधावयाचा आहे. हा संपर्क क्रमांक 24 x 7 सुरू राहणार असल्याचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी कळविले आहे.