ऑनलाइन टीम / पुणे :
आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयात इंडियन रेड क्रॉस सोसायटी च्या सहकार्याने आपत्कालीन व्यवस्थापन आणि आग नियंत्रण कार्यशाळा आणि आग नियंत्रण प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती.
आबेदा इनामदार महाविद्यालयात ही प्रात्यक्षिके पार पडली. कर्नल डॉ. प्रमोदन मराठे, अंकिता पांडे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य शैला बूटवाला, रईसा शेख,मन्सुरा मुलाणी, उस्मा सरखोत, शबाना शेख, डॉ. राहुल मोरे, शहाजहाँ शेख, निकिता पांढरे, नेहा पै, जनत काझमी उपस्थित होते.