पोल्का डॉट ‘नेलआर्ट’
हे नेहमीच टेंडमध्ये असलेलं ‘नेलआर्ट’ आहे. यासाठी आधी एक ‘न्यूड नेल कलर’ची गरज लागते. ज्यावर तुम्ही ‘व्हाईट नेल कलर’ने ‘पोल्का डॉट्स’ बनवू शकता. हे डिझाईन ‘टूथपिक’चा वापर करूनही बनवू शकता. यासाठी कोणत्याही दोन रंगसंगतींचा वापर करून हे करता येते.
ग्लिटरी ‘नेलआर्ट’
याचे वैशिष्टय़ म्हणजे हे लावणे खूपच सोपे आहे. हे लावल्यावर तुमच्या नखांना ‘बोल्ड लुक’ही मिळतो. तुमची आवडती ‘न्यूड शेड’ नखांवर लावावी आणि ‘स्पंज ग्लिटर’मध्ये नखे बुडवून ठेवावीत. हे सुकल्यावर त्यावर अजून एक ‘न्यूड कोट’ लावावा.
‘ऍनिमल नेलआर्ट’
आजकाल ऍनिमल पिंटही खूपच टेंडमध्ये आहे आणि सर्वात जास्त टेंडमध्ये आहे लेपर्ड पिंट. या नेलआर्टसाठी खास ब्रशसुद्धा मिळतो. याशिवाय ऍनिमल पिंट डिझाईन्स स्टीकर्सही बाजारात मिळतात.
फ्लोरल ‘नेलआर्ट’
हा पॅटर्न खूपच सुंदर दिसतो. मॅनिक्मयुअर केल्यानंतर हे नेलआर्ट केल्यास खूपच छान दिसतं. या डिझाईनसाठी तुम्ही न्यूड नेलपेंट नखांवर लावून घ्या. एका पातळ ब्रशवर व्हाईट नेलपेंट घेऊन सुंदरसं फूल काढा. फूल काढून झाल्यावर फुलाच्या मध्यभागी पिवळय़ा रंगाचा एक डॉट काढा. डिझाईन सुकल्यावर एक फायनल कोट लावा.
ब्रशने पेटींग
तसं तर नेल आर्टसाठी अनेक प्रकारचे ब्रश वापरले जातात. पण सर्वात जास्त सिंथेटिक ब्रिसलचा ब्रश चांगला मानला जातो. या ब्रशच्या साहाय्याने डिझाईनने एंगल्ड, लाईन, फ्लॅट, डॉटींग, डिटेल अशा डिझाईन्स बनवू शकता. या नेलआर्टने तुमची नखं खूप छान दिसतात.
स्टँम्पिग
जर तुम्हाला सोप्या पद्धतीने नखांवर नेल आर्ट करायचं असेल तर वापर करा स्टँप्सचा. बाजारात अनेक डिझाईन्सचे नेल स्टँप्स मिळतात. त्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळे नेल आर्ट डिझाईन्स नखांवर करू शकता. यासाठी सर्वात आधी नेल पॉलिश लावा आणि त्यावर स्टँप लेयर लावून कव्हर करा.
नेल आर्ट स्टिकर्स
जर तुम्हाला घरच्या घरी कोणताही पसारा न करता नेल आर्ट करायचं असल्यास सोपा मार्ग म्हणजे बाजारात मिळणारे नेल आर्ट स्टिकर्स वापरून नखं सजवणं. यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही आणि हवं ते डिझाईन तुम्ही थेट नखांवर लावू शकता.
युनिकॉर्न आणि मर्मेड ‘नेलआर्ट’
सध्या सगळीकडेच पेझ आहे ती युनिकॉर्न आणि मर्मेड्सची आहे. मग ते विविध अक्सेसरीज असो वा नेलआर्टमध्ये. हे गर्ली ‘नेलआर्ट’ नखांवर फारच सुंदर आणि कलरफुल दिसतं. यामध्ये ड्रीम कॅचरलाही खूप मागणी आहे.