सांगली / प्रतिनिधी
आपल्याला लोकांच्यासाठी काहीतरी करायचे आहे म्हणुन काम करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले.
महिलांना संघटना बांधणी करताना येणार्या अडचणींचा तसेच ग्रामीण व शहरी भागातील महिला संघटनेचा आढावा घेतला. बुथ कमिटींच्या बांधणी करून महिलांना सक्षम करण्यांसाठी प्रयत्नशील राहावे. महिला बचत गटांना प्रोत्साहित करा. त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देत त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करा.आपण महिलांनी महिलांसाठी केलेल्या कामाला न्याय देण्याची जबाबदारी माझी असेल. अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील , संजय बजाज , बाळासाहेब पाटील , महिला अध्यक्षा छाया पाटील,विनया पाठक, पुजा लाड, अम्रुता चोपडे , अनिता पांगम, वंदना चंदनशिवे , वैशाली कळके , सुश्मिता जाधव, आदी उपस्थित होते.