जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर
प्रतिनिधी/ म्हापसा
भारतीय जनता पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून आपली उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आपण सर्वांचा ऋणी आहे. आपल्यास दिलेल्या पदाचे आपण सोने करून दाखविणार असल्याची माहिती नवनिर्वाचित जिल्हा पंचायत उत्तर गोवा अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांनी दै. ‘तरुण भारत’ला दिली.
कुडणेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या कार्यकत्यांनी सुकूर मतदारसंघात रॅलीचे आयोजन केले होते. कुडणेकर यांनी पर्रा पंचायतीमध्ये सरपंच डिलायला लोबो यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला व नमस्कार केला.
भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पालक मंत्री मायकल लोबो, संघटन मंत्री सतीश धोंड, सरपंच डिलायला लोबो या सर्वांनी मिळून ज्यांनी माझ्या सारख्या सामान्य साध्या माणसाला जिल्हा पंचायत निवडणुकीत रिंगणात ठेवून निवडून आणून मला विजयी केल्याबद्दल त्यांचे आभार मानणे कमीच आहे. वाईट प्रसंगी हे सर्व माझ्या पाठिशी राहिले. मला उत्तर गोवाचे अध्यक्षपद दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. जे जिल्हा पंचायतीचे निधी देणार तो सर्वांना बरोबरीने घेऊन विकास साधणार असल्याची माहिती जिल्हा पंचायत अध्यक्ष कार्तिक कुडणेकर यांनी माहिती दिली. पर्रा, साळगाव, गिरी हा सुकूर पंचायतीला भाग येतो. येथील सरपंच कार्यकर्ते यांनी आपल्यावर विश्वास ठेवला तसेच जे आपल्यासाठी अहोरात्र झटले त्यांचे उपकार मानणे कमीच आहे. सुकूर सरपंच संदीप वझरकर व त्यांची टिम व सर्वांचा मी ऋणी राहीन.
भाजप पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून जे पद मला भूषविले त्या संधीचे सोने करून दाखविणार आहे. असे ते म्हणाले. आज भाजपचा सरकार आहे. मुख्यमंत्री आहे जी वल्ल्ही कामे आहे ती चालीस लावणार असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्यास स्पष्ट सांगितले आहे गावागावात ज्या घरांना शौचालये नाही ती का नाही याचा पुरेपूर अहवाल मागितला आहे. जी काही कामे आहेत ती एका महिन्यात सर्वांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत आम्ही तो सर्व अहवाल सादर करणार आहे असे कार्तिक कुडणेकर म्हणाले.
कुडणेकरांच्या रुपात डायमंड निवडला- डिलायला लोबो
सुकूर जिल्हा पंचायतीचे सदस्य कार्तिक कुडणेकर यांची उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी निवड करून भाजपने कुडणेकरांच्या स्वरुपात डायमंडची निवड केली आहे. आम्ही मुख्यमंत्री, संघटन मंत्री प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष आदींचे आभारी आहोत. कुडणेकर या पदाचा योग्यरीत्या वापर करून सर्वांना न्याय मिळवून देईल असे पर्राच्या सरपंच डिलायला लोबो म्हणाल्या.