ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभेसाठी निवडणुकीसाठी बिगूल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष तयारीला लागले आहेत. आम आदमी पक्षाने (आप) विधानसभा निवडणुकीसाठी नवे कॅम्पेन साँग तयार केले आहे.
आप समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गाणे ट्विटरवर शेअर केले आहे. ‘लगे रहो केजरीवाल’ असे या गाण्याचे बोल आहेत. विशाल ददलानी यांनी या गीताची रचना केली आहे. मागील वषीही त्यांनी केजरीवाल यांच्यासाठी रचना केली होती.
‘लगे रहो केजरीवाल’ हे गीत 2 मिनिटे 53 सेकंदांचं आहे. या गाण्यात वीज, पाणी, मोहल्ला क्लिनिक अशा मुद्यांचा समावेश आहे. तसेच महिलांना मोफत बस सेवेचाही यात उल्लेख करण्यात आला आहे. केजरीवाल यांना दिल्लीचे सुपूत्र दाखवत ते किती सामान्य राहत काम करतात असा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गाण्यात दिल्लीतील जनतेला खुशीत ठेवण्याठी किती कसोशीने काम करतात असं दाखवण्यात आहे.