मुंबई : प्रतिनिधी
एका आफ्रिकन महिला नागरिकाला सोमवारी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली असून सीमाशुल्क विभागाने तिच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 56 कोटी रुपये किमतीचे 8 किलो हेरॉईन जप्त केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
महिलेकडे पांढरी पावडर आढळून आली, त्याची तपासणी केली असता ते हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.