वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा आफ्रिदी माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. आफ्रिदीने अलीकडेच आपला सर्वोत्तम विश्वचषक खेळाडूंचा संघ जाहीर केला. विशेष म्हणजे, आफ्रिदीच्या या सर्वोत्तम संघात दिग्गज सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा तसेच पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू इम्रान खान यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.
आफ्रिदीने सलामीवीर म्हणून पाकिस्तानचा सईद अन्वर आणि ऍडम गिलक्रिस्ट यांना संघात स्थान दिले आहे. तसेच आफ्रिदीच्या संघात विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. याशिवाय, आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस यांच्यासह ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅकग्रा व शेन वॉर्न यांनाही संघात स्थान दिले आहे.
आफ्रिदीचा सर्वोत्तम विश्वचषक संघ : सईद अन्वर, ऍडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिग, विराट कोहली, इंझमाम उल हक, जॅक कॅलिस, वसिम अक्रम, शोएब अख्तर, सकलेन मुश्ताक, ग्लेन मॅकग्रा व शेन वॉर्न.