प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. आर. आर. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी सांगली जिल्हय़ातील तासगाव येथील अंजली गावाला भेट दिली. आर. आर. पाटील यांच्या निर्मळस्थळ या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करण्यात आले. आबांचे सुपूत्र रोहित पाटील यांची भेट घेण्यात आली.
यावेळी आबांच्या बेळगाव भेटीच्या व सीमाप्रश्नी तळमळीबाबत आठवणींना उजाळा दिला. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष सचिन कळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, राजू कदम, प्रवीण रेडेकर, सिद्धार्थ चौगुले, प्रतीक पाटील, जोतिबा पाटील आदी उपस्थित होते.