प्रतिनिधी / कोल्हापूर
शेतकऱयांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर
जागर एफआरपीचा आराधान शक्तीपीठांची’ यात्रा काढण्यात येणार आहे, दख्खनचा राजा जोतिबाला अभिषेक घालून 7 ऑक्टोंबरला यात्रेस सुरवात होणार आहे. 12 जिल्हÎातील शक्तीपीठांसमोर शेतकऱयांचे साकडे घालत खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे यात्रेची सांगता होणार आहे. अशी माहिती शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पंचगंगा परिक्रमा यात्रेवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्या मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही असा खणखणीत इशारा शेट्टी यांनी सरकरला दिला आहे.
ते म्हणाले, केंद्र, राज्य सरकार आणि कारखानदार यांचे एफआरपीच्या तुकडÎावर एकमत झाले आहे. मात्र काहीच चुकीची माहिती देऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र स्वाभामानीची भूमिका ही शेतकरी हिताचीच आहे. गेली पंचवीस वर्षे शेतकऱयांचे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत. महापुरामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले अनेक घरे जमीनदोस्त झाली, मात्र राज्य सरकारने दखल घेतली नाही यासाठी पंचगंगा परिक्रमा यात्रा काढावी लागली. मुख्यमंत्र्यानी बैठक घेऊन आश्वासन दिले मात्र अद्याप पूर्ण झाले नाही. याकडे लक्ष वेधत त्यांना सरकाला दसऱयाचा अल्टिमेट दिला. दसऱयापर्यंत केलेल्या घोषणेची अमलबजावणी झाली नाही तर पुढील परिणामांना समोरे जाण्याची तयारी ठेवावी असा गर्भित इशारा दिला आहे.
पूरग्रस्त शेतकरी, एकरकमी एफआरपी, सोयाबीनचे पाडलेले दर आदी विषय घेऊन ही यात्रा सुरु होणार आहे. जोतिबा, अंबाबाई, औदुंबर, पंढरपूर, परळी वैजनाथ, पैठण शिर्डी, भिमाशंकर, जेजुरी या शक्तीपीठांचा जागर यात्रेदरम्यान होणार आहे 15 ऑक्टोंबरला यात्रेची सांगत होणार असून बारामतीतील साखर कारखान्यार जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर 19 ऑक्टोंबरच्या ऊस परिषदे पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. असे शेट्टी यांनी सांगितले.
जिल्हा बँकेत शेतकरी प्रतिनिधी
जिल्हा बँक शेतकऱयांची आहे. तर तेथे शेतकरी चळवळीतील प्रतिनिधी का नको असा सवाल शेट्टी यांनी केला. किमान एक जागा स्वाभिमानीला सोडली पाहिजे. अशी मागणी करत शिरोळमधील सर्वपक्षिय नेत्यांनी गणपतराव पाटील यांचे नाव सुचवले आहे. त्यामुळे हे मागील निवडणुकीतच ठरले होते. यड्रावकरांनी खोटे बोलू नये.
सविस्तर यात्रा अशी तारीख ठिकाण
7 जोतिबा, अंबाबाई, बाळूमामा
8 औदुंबर, पंढरपूर, अक्कलकोट
9 तुळजापूर, लातूर
10 परळी वैजनाथ
11 पैठण, जामखेड
12 जामखेड, शिर्डी
13 नाशिक
14 भिमाशंकर, दगडूशेठ15 जेजुरी बारामती