ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात कोणतरी ज्योतिरादित्य शिंदे तयार होतीलच अशे म्हणत महाविकास आघाडीला सावधनतेचा इशारा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज उत्तर दिलं आहे. आमच्याकडे कुणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही. असे प्रतिउत्तर देत पवारांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली.
पवार म्हणाले, भाजपमध्येच कोण ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईल म्हणत पाच वर्ष विरोधी बाकावर काढलीत तरी चालेल. तुम्हाला तुमचे आमदार सांभाळावे लागणार आहेत. नाहीतर तुमचेच आमदार इकडे तिकडे जातील. आज तुमचे बरेच आमदार आलेले नाहीत गैरहजर आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवा.