वार्ताहर / कणकुंबी
आमटे येथे गणेश जयंतीनिमित्त आमटे, गोल्ल्याळी, पारवाड, कणकुंबी आणि जांबोटी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य तसेच जांबोटी आणि आमटे कृषी पत्ती संघाचे अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमटे ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर होते.
गेल्या सहा वर्षांपूर्वी आमटे येथे गणेश मंदिर उभारण्यात आले आहे. तेंव्हापासून दरवषी गणेश जयंती सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करून भजन कीर्तन केले जाते. दि. 15 फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त दिवसभर विविध धर्मिक कार्यक्रमांसह दुपारी महाप्रसादाचेही आयोजन केले होते. त्यानंतर आमटे, गोल्ल्याळी आणि चिखले गावचा भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री 10 वाजता आमटे ग्रामपंचायत अध्यक्षा पार्वती काळू नाईक, जांबोटी ग्रा. पं. अध्यक्ष महेश गुरव, गोल्ल्याळी ग्रा. पं. अध्यक्षा तनुजा तुकाराम गुरव, आमटे ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला नाईक, सदस्य सुनील पवार चिखले, नामदेव गुरव गोल्ल्याळी, राणी कांबळे, धोंडीबाई धनगर गोल्याळी, मयुरी सुतार जांबोटी तसेच आमटे कृषी पत्तीन सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर, उपाध्यक्ष सुभाष गावडे, संचालक बसवंत नाईक, रायाप्पा गावडे, विठ्ठल नाईक, नारायण गावडे, लक्ष्मी बामणवाडकर तसेच जांबोटी कृषी पत्तीनचे उपाध्यक्ष राजन कुडतरकर या सर्वांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांना आविष्कार फौंडेशन इंडियातर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.