सभापती रमेश तवडकर यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केलेल्या आठ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर येत्या 15 दिवसांत पहिली सुनावणी घेणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.
याबाबत तीन याचिका सभापतीसमोर आल्या आहेत. यातील एक याचिका आमदार मायकल लोबो व दिगंबर कामत यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखल केली आहे. इतर दोन याचिका फुटीर आठ आमदारां विरोधात असून या याचिका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व काँग्रेस नेते डॉम्निक नोरोन्हा यांनी दाखल केल्या आहेत. प्रकरण गुतागुंतीचे असल्याने याच्यावर अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामुळे सुनावणी घेण्यासाठी वेळ लागणार असल्याचे सभापती तवडकर म्हणाले.