शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांबाबत चर्चा
प्रतिनिधी / वाकरे
पुणे शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी विधानभवनातील मुख्यमंत्री दालनात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या व अडचणीबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भविष्यकाळात शिक्षण क्षेत्रासाठी ठोस कार्यक्रम राबवून या क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजू आवळे, प्रकाश आबिटकर, अरुण लाड व इतर आमदार उपस्थित होते.