ब्रह्मानंद पडळकर गंभीर जखमी
आळसंद/वार्ताहर
सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रम्हानंद पडळकर गंभीर जखमी झाले असून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना मालवाहू टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीचा समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. तर पिकअप गाडीच्या समोरील भाग चक्काचूर झाला आहे.
या अपघातात ब्रह्मानंद पडळकर ड्रायव्हर सह तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. ब्रम्हानंद पडळकर यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअप गाडीतील चालकही जखमी झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाहतूक विस्कळीत झाली होती. जखमींना विट्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गोपीचंद पडळकर यांनी आपला साताऱ्याचा दौरा सोडून विट्याकडे रवाना झाले आहेत.