प्रतिनिधी/कोल्हापूर
शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या थेट पाईप लाईन योजनेचे काम कोणत्या स्थितीमध्ये आहे, त्यावर करावयाच्या उपाययोजना या संदर्भात आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापालिका प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी विविध सूचना केल्या. यासोबतच शहराच्या संबंधातील विविध अडचणी आणि प्रश्नांवर त्यांनी प्रशासनासोबत चर्चा करून योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या.
यावेळी या बैठकीस आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, धनंजय आंधळे, जल अभियंता भास्कर कुंभार, पर्यावरण अभियंता व्हरांबळे, नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, घाटगे वाहतूक नियंत्रण शाखेचे फौजदार मधु चौगुले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.