गोवा फॉरवर्डच्या संतोष सावंत यांचे आव्हान
प्रतिनिधी / पणजी
पिळगाव पंचायत सरपंच व तीन पंचांनी गोवा फॉरवर्डमधून भाजपमध्ये प्रवेश केला तरी त्याचा परिणाम गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कामावर होणार नाही. मयेचे आमदार प्रवीण झांटय़े यांनी मागील चार वर्षात मये मतदारसंघात किती विकासकामे केली व पुढील एका वर्षात किती कामे करणार याची माहिती देणारी श्वेतपत्रिका जारी करण्याचे आव्हान गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस संतोष कुमार सावंत यांनी आज पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले.
पिळगाव पंचायत दोन वर्षे गोवा फॉरवर्डकडे होती. पंचायतीचे सरपंच व तीन पंचांनी गोवा फॉरवर्ड पक्षातून भाजपामध्ये प्रवेश घेतला. विकासासाठी पंचायतसदस्य दुसऱया पक्षात गेले. गोवा फॉरवर्ड पक्ष सरकारमध्ये असताना पिळगावमध्ये विविध विकासकामे केली. सध्या सरकारमध्ये पक्ष नाही म्हणून विकासकामे थांबविली नाहीत. विद्यमान मयेचे आमदार झांटय़े हे काँग्रेसचे मात्र 2017च्या निवडणूकीत त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाने बजावलेली कामगिरी पार पाडताना त्यांना निवडून आणले होते. गेल्या चार वर्षात लोकापर्यंत पोहचले नाहीत मात्र ते स्वतःच्या व्यवसायात गुंतून राहिले. या उलट गोवा फॉरवर्डचे तीन आमदार सत्तेमध्ये मंत्री होते तसेच कृषी व जलसंपदा खाती त्यांच्याकडे होती त्यामुळे मये मतदारसंघात कृषी व जलसंपदा खात्यातर्फे अनेक काम सुरू करण्यात आली होती. पिळगाववासी हे गोवा फॉरवर्ड पक्षासोबत आहेत. सरपंच व पंचांनी इतर पक्षात प्रवेश घेतला म्हणून त्याच परिणाम पक्षावर होणार नाही.
मये मतदारसंघात असलेल्या सात पंचायतीपैकी पिळगाव पंचायत गोवा फॉरवर्डकडे होती. त्यातील सरपंच व पंचांना आमिषे दाखवून भाजपने आपल्याकडे ओढले असले तरी लोकांची कामे तसेच मतदारसंघाचा विकास कोणी केला हे लोकांना माहित आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणूकीत मतदार गोवा फॉरवर्डच्या बाजूनेच राहतील असा दावा सावंत यांनी केला आहे.
मयेमध्ये गोवा फॉरवर्ड पक्ष सक्षम आणि सक्रीय आहे. स्थानिक आमदार हे वैयक्तिक विकास करणाऱयावर जास्त भर देतात. आमदार म्हणून मये मतदारसंघात जी कामे केली झांटय़े यांनी दाखवून द्यावी अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे आनंद पार्सेकर यांनी यावेळी केली.
यावेळी विशाल मातोंडकर, महिला अध्यक्ष शीला घाटवळ व इतर मान्यवर उपस्थित होते.