सीपीआरमध्ये यंत्रणा सज्ज, सिपीआर रुग्णालयात पोलीस बंदोबस्त
कोल्हापूर/प्रतिनिधी
शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामिन अर्जावर सोमवारी सुनावणी होवू शकली नाही. यामुळे आमदार नितेश राणे यांना उपचारासाठी कोल्हापूर सिपीआर रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. नितेश राणे सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ओरोस (जि. सिंधुदुर्ग) येथून उपचारासाठी कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. यामुळे सिपीआर रुग्णायलयात दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.