संतोष परब हल्ल्याप्रकरणी कारवाई
ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. यानंतर ते कणकवली दिवाणी न्यायालयात हजर झाले. याआधी त्यांनी न्यायालयासमोर शरण देखील होत आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली. नितेश राणे कोर्टात हजर झाल्यांनतर त्यांना पोलीस कोठडी मिळणार की बेल मिळणार याकडे प्रतीक्षा लागून राहिली होती पण अखेर नितेश राणे यांना ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान, नितेश राणे यांचे वकील जामिनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करत होते. परंतु, सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही? याबाबत गोंधळ कायम होता. अखेर न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.