प्रतिनिधी/ विजापूर
सी. पी. योगेश्वर यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्याची हिंमत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यात नाही. एकतर ते राजीनामा देतील किंवा योगेश्वर यांना उपमुख्यमंत्री करतील या दोनपैकी एक गोष्ट येत्या 15 जूनच्या आत घडेल असा गौप्यस्फोट विजापूरचे भाजप आमदार बसनगौडा पाटील – यत्नाळ यांनी सोमवारी केला.
योगेश्वर मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याबाबत विजापूर येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी राज्यात राजकीय भूकंपाचे संकेत दिले. 15 जूनच्या आत योगेश्वर यांना मुख्यमंत्री करून इंधन खाते द्यावे अन्यथा मुख्यमंत्र्यांना राजानीमा द्यावा लागेल असेही भाकित त्यांनी यावेळी केले.
राज्यात महामारी नियंत्रणात येत आहे. ज्याठिकाणी संसर्ग कमी झाला आहे तेथील लॉकडाऊन काढला पाहिजे. राजकीय लाभासाठी लॉकडाऊनचा दुरूपयोग केला जाऊ नये. सात जून पर्यंत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन कमी करावा असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.