लोबो यांना राज्य करण्याचा योग लाभू दे ः उपस्थित मान्यवरांच्या प्रतिक्रीया
प्रतिनिधी/ म्हापसा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, युरी आलेमाव, हळदोणेचे आमदार कार्लुस आल्वारीस फ्sढरेरा, संकल्प आमोणकर, प्रदेश युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, अमरनाथ पणजीकर, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, डिलायला लोबो, कळंगूट सरपंच शॉन मार्टीन्स, कांदोळी सरपंच ब्लेझ डिसोझा, हडफडे सरपंच श्रीकृष्ण नागवेकर, पर्रा सरपंच जोसफीन डिक्रुझ व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार मायकल लोबो यांचा वाढ†िदवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.
विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना आज आम्ही बार्देशचा किंग म्हणून ओळखतो. पुढे असा योग लाभू दे की, लोबो गोवा राज्यावर राज्य करू शकेल आणि तमाम गोमंतकीयांचे कल्याण करू शकेल, अशा प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी मायकल लोबो यांच्या वाढदिनी केक कापल्यावर शुभेच्छापर भाषणात बोलताना व्यक्त केल्या.
मायकल लोबो यांनी कळंगूट मतदारसंघात जी काही विकासकामे केली आहेत ती तमाम जनतेला माहीत आहेत. आमदार वा मंत्री म्हणून काम करीत असताना त्यांना पत्नी डिलायला लोबो यांचे सदैव सहकार्य लाभले व त्याही आज आमदार आहेत. पुढे जाऊन या दोघांच्या हातून यापेक्षाही अधिक चांगले कार्य घडू दे, अशा शुभेच्छा आमदार †िदगंबर कामत यांनी दिल्या.
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही लोबो यांना शुभेच्छा दिल्या. युरी आलेमाव, वरद म्हार्दोळकर, कार्लुस आल्वारीस आदीनीही शुभेच्छा देत लोबो यांना राज्यावर राज्य करण्याचा योग त्यांना प्राप्त होतो असे सांगितले. विविध खात्यातील अधिकारी, अभियंता, कार्यकर्ते आदीनी लोबोना घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.
जनतेच्या विश्वासाने विकास घडोः लोबो
प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार येतात. उतार आल्यावर असे वाटते की सर्वकाही संपले आहे, हे राजकारण पुढे नसणार काय? पण जनतेत गेल्यावर चार दिवसात पुन्हा विश्वास निर्माण होतो. आमच्याबरोबर जनता असून तीच्यासाठी आम्ही काम करणार. निवडणुकीनंतर खूप कामे झाली आहेत. कळंगूट कांदोळीतच नव्हे तर शिवोली मतदारसंघ, साळगाव, म्हापशात जी आम्ही विकास कामे मंजूर केली होती ती पूर्ण झाली आहेत.
पायाभूत सुविधा, पावसापूर्वी सर्व गटारे साफ झाली. पंचायत सदस्यांनी ही सर्व कामे केली. गटविकास अधिकाऱयांनीही सहकार्य केले. जेणेकरून वाडय़ावरील नागरिकांना त्याचा फायदा होतो. सरकारी कार्यालयात फाईल घालताना तेथे विरोधक सत्ताधारी नसतो. येणाऱया काळात यापेक्षाही चांगले काम करण्यास आम्ही तत्पर आहोत. आम्ही गरिबासाठी सदैव झटणार आहोत, असे सांगून लोबो यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
0618map2
म्हापसा ः वाढदिवसा निमित्त विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना केक भरविताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत. बाजूस आमदार डिलायला लोबो, अमरनाथ पणजीकर, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व इतर.