प्रतिनिधी/ फोंडा
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरनगर कुर्टी फोंडा येथे आमदार रवी नाईक यांच्याहस्ते साजरी करण्यात आली. पं. नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी लहान मुलांना चॉकलेट, मिठाई व खाऊ वाटून पं. नेहरूंची जयंती साजरी करण्यात आली. तसेच येथील रहिवासियांसाठी बागेत आसनांची व्यवस्था क रताना गार्डन बेंच भेट देण्यात आले. यावेळी जि.प. उमेदवार वृत्तीका वैभव नाईक, हुसेन मुल्ला, अशोक नाईक, शब्बीर शेख, सुभाष गवंडार,बाब काझी, हरीष नाईक, टोनी डायस, आचल वेरेकर, आकाश, ऍड. वैभव नाईक, दिलीप नाईक आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार रवी नाईक म्हणाले नेहरू यांना लहान मुलांविषयी प्रेम होते. भारताच्या सर्वागिण उन्नती साधण्याचा पं. नेहरू यांनी नेहमी प्रयत्न केला त्यामुळे त्याचे विस्मरण कधीच होऊ देणार नसल्याचे ते म्हणाले.
गटाध्यक्ष अरूण गुडेकर यांनी स्वागत केले. गट सचिव किशोर नाईक यांनी आभार मानले.