लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा धडाका कायम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राजापूरचे आमदार राजन साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीचा धडाका सुरूच ठेवण्यात आला आह़े सोमवारी विधानसभा अधिवेशनाची सुरूवात होत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचारी आमदार साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी दाखल झाल़े यावेळी साळवी यांचे जुने तेली आळीमधील घर, खालची आळीतील बंगला, दुर्गेश बार आणि रेस्टॉरेन्ट हॉटेलची मोजणी केल़ी
आमदार राजन साळवी यांना 4 डिसेंबर 2022 रोजी रायगड लाचलुचपत विभागाकडून चौकशीसाठी नोटीस देण्यात आली होत़ी त्यानुसार साळवी हे चौकशीसाठी रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विभागासमोर हजर झाले होत़े यावेळी साळवी यांच्या संपत्तीची माहिती अधिकाऱयांनी घेतल्याची माहिती समोर आली होत़ी दरम्यान यानंतरही साळवी यांची चौकशी विभागाकडून कायम ठेवण्यात आली असल्याचे दिसून येत आह़े सोमवारी लाचलुचपतचे अधिकारी साळवी यांच्या घरी दाखल होताच शहर परिसरात एकच गोंधळ उडाला तसेच शिवसैनिक देखील घटनास्थळी दाखल झाल़े मात्र संयमाने परिस्थिती हाताळत अधिकाऱयांनी आपले काम सुरू ठेवल़े
राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर आमदार राजन साळवी हे उद्धव ठाकरे गटासोबत राहिले होत़े तसेच नाणार येथील प्रस्तावित रिफायनरीला देखील आमदार साळवी यांनी पाठिंबा दर्शविला होत़ा यामुळेच आपल्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे आमदार साळवी यांनी सांगितले होत़े आपण निष्ठावंत असून उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही. नारायण राणे शिवसेना सोडून गेले तेव्हा देखील मी शिवसेनेसोबतच राहिल़ो ज्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ताचा असल्याचा आरोप होतात़ ते नंतर भाजपमध्ये जाऊन स्वच्छ होत आहेत़ नोटीस पाठवण्याइतके माझ्याकडे कोणते घबाड आहे, हाच प्रश्न आपल्याला पडला असल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले होत़े
आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांच्याकडील संपत्तीचा आढावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेण्यात आला होत़ा तसेच त्यांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याचे विभागाकडून सांगण्यात आले होत़े मुंबई येथे विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारे कारवाई होत असल्याने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आह़े