प्रतिनिधी / वैभववाडी:
तालुक्मयातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रॅपिड तपासणी कीटचा निर्माण झालेला तुटवडा विचारात घेऊन आमदार नीतेश राणे यांनी मोफत रॅपिड टेस्ट कीट उपलब्ध करून दिल्या आहेत. आरोग्य विभागाकडील कीट संपल्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या टेस्ट करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. वैद्यकीय अधिकाऱयांनी आमदार राणे यांच्याकडे रॅपिड टेस्ट कीटची मागणी केली होती.
रॅपिड कीटच्या कमतरतेमुळे तपासणी नाक्मयांवरील रॅपिड तपासणी बंद करावी लागली होती. आरोग्य विभागाची गैरसोय विचारात घेऊन आमदार राणे यांनी सुमारे 600 कीट रुग्णालयांना दिल्या आहेत. हे कीट वैद्यकीय अधिकारी धर्मे व उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी, वैभववाडी माजी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगरसेवक संजय सावंत, उंबर्डे सरपंच एस. एम. बोबडे, वैभववाडी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, उपसरपंच दशरथ दळवी, ग्रामसेवक कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.