कणकवली:
आमदार नीतेश राणे यांनी पुरविलेल्या 100 पीपीई किट्सचे कणकवलीत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते डॉक्टरांना वाटप करण्यात आले. आमदार राणेंनी ‘व्हॅल्युएबल गिफ्ट’ दिले आहे. यापुढे आयसोलेट कक्षात जाऊन डॉक्टर आत्मविश्वासाने रुग्णावर उपचार करतील, असे डॉक्टर प्रॅटर्निटी क्लबचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे म्हणाले.
यावेळी डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. सुहास पावसकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, डॉ. सी. एम. शिकलगार, डॉ. सतीश टाक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, 108 रुग्णवाहिका जिल्हा मॅनेजर शंतनू वाईकर, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. प्रशांत मोघे, डॉ. गीता मोघे, डॉ. नीलेश कोदे, डॉ. नीलेश पेंडुरकर, डॉ. रसिका पेंडुरकर, डॉ. सर्वेश तायशेटे, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. अभिजीत कणसे आदी उपस्थित होते.