प्रतिनिधी/ सातारा
आमदार शिवेंद्रसिंहराजे हे एक स्पोर्टमन म्हणून ओळखले जातात.सायकलिंग,धावणे, पोहणे यामध्ये ते किंगच आहेत.नुकताच त्यांनी शेतात ट्रक्टर चालवला त्यापाठोपाठ जमीन लेव्हल करायचे मशीन चालवले.त्यांचे व्हिडीओ कार्यकर्त्यांनी स्टेट्स ठेवले. तर काल आमदार शिवेंद्रसिंहराजे हे सदरबाजारमध्ये एका उद्घाटनाला गेले होते.तेथे कार्यकर्त्यांनी कॅरम खेळण्यासाठी विनंती केली मग आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी स्ट्राईकर हाती घेतला.अन काही काळ ते बालपणीतल्या आठवणी सांगत कार्यकर्त्यांमध्ये रमून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल आज दुपारी झाला आहे.
आमदार शिवेंद्रराजे यांच्या क्रेझ कार्यकर्त्यांच्या मनात आहे ती एक स्पोर्ट्समन म्हणून.धावणे, सायकलिंग यामध्ये त्यांचा नियमित सराव असतो.तसेच नुकतेच त्यांनी शेतकयांप्रमाणे शेतात ट्रक्टर चालवला आहे तर त्यानंतर त्यांनी जमीन लेव्हल करण्याचे मशीन चालवले होते.त्यांच्या या व्हिडीओज कार्यकर्त्यांनी आपल्या स्टेस्ट्सला ठेवले होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची युवकांच्या एक क्रेझ बनू लागली आहे.त्यांना बुधवारी सायंकाळी सदरबाजार येथे एका उद्घाटनाला बोलावले होते.उद्घाटन झाल्यावर कार्यकर्त्यांनी आग्रह केला की कॅरम खेळण्याचा.मग काय कॅरम बोर्डवर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी स्ट्राईकर हातात घेऊन लहानपणी कॅरम खेळत होतो असे कार्यकर्त्यांना सांगत ते बालपणीच्या आठवणीत रमून गेले.