बेंगळूर : विधानसभेत 4 मार्च रोजी शर्ट काढून राज्य सरकारचा निषेध नोंदविलेल्या काँग्रेस आमदार बी. के. संगमेश यांना 7 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. संगमेश यांच्या अनुचित वर्तनप्रकरणी हक्कभंग समितीमार्फत चौकशी केली जाणार आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे सांगून विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी रुलिंग दिले. काँग्रेस आमदारांचे धरणे आंदोलन, घोषणाबाजी सुरू असतानाही भाजप आमदार अरग ज्ञानेंद्र यांनी मंगळवारी विधानसभेत आमदार संगमेश यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे सोपविण्यासाठी सभाध्यक्षांनी रुलिंग दिले. मात्र, सभाध्यक्षांच्या या भूमिकेबद्दल काँग्रेस आमदारांनी नाराजी व्यक्त केली. हक्कभंग प्रस्तावावर सभागृहात चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र, काँग्रेस आमदार धरणे आंदोलन करून आडकाठी आणत असल्याने आपण हक्कभंग प्रस्ताव समितीकडे सोपविल्याचे समर्थन सभाध्यक्ष कागेरी यांनी केले.
Previous Articleमाजी खासदार के. विरुपाक्षप्पा समर्थकांसह भाजपमध्ये
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.