आमरस
साहित्यः 2 पिकलेले आंबे, चवीनुसार साखर, आवश्यकतेनुसार दूध, पाव चमचा वेलची पावडर
कृतीः आंबे स्वच्छ धुवून साल काढावी. आंबा चिरून घ्यावा. आता मिक्सर ब्लेंडरमध्ये आंब्याच्या फोडी, दूध, साखर व वेलची पावडर एकत्र करून त्याचा रस करून घ्यावा. एका भांडय़ात हा रस काढून फ्रिजमध्ये थोडा वेळ ठेवावा. आता तयार आमरस पुरी अथवा चपातीसोबत खाण्यास द्या. अथवा जेवणानंतरही खाऊ शकता.
टीपः आमरसासाठी शक्यतो हापूस आंबा निवडावा. यामध्ये दुधाचा वापर कमी करावा. आंब्याची चव पाहून साखरेचे प्रमाण ठरवावे.
पुरी
साहित्यः 2 वाटय़ा गव्हाचे पीठ, चिमुटभर मीठ, 1 चमचा रवा, तळण्यासाठी तेल
कृतीः
बाऊलमध्ये गव्हाचे पीठ चाळून घ्यावे. त्यात रवा आणि मीठ घालून मिक्स करावे. नंतर त्यात थोडे थोडे करीत आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचा गोळा मळून घ्यावा. तेलाचा हात लावून गोळा अर्धा तास झाकूण ठेवावा. नंतर हाताला थोडेसे तेल लावून गोळा परत एकदा मळून त्याचे लिंबाएवढे गोळे करावेत. थोडेसे तेल लावूनच त्याची पुरी लाटावी. तयार पुरी गरम तेलात सोनेरी रंगावर तळून काढावी. आता तयार पुरी आमरससोबत खाण्यास द्यावी.