फोटोग्राफर्स-व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
सध्या लग्नसराई सुरू आहे. विवाहासाठी विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. ते निर्बंध पाळत विवाह होत आहेत. फोटोग्राफर्सही फोटो काढण्यासाठी जात आहेत. मात्र, क्लोजडाऊन काळात फोटो काढण्यासाठी लग्न समारंभाच्या ठिकाणी जाणे अवघड जाणार आहे. तेव्हा आम्हाला क्लोजडाऊनमधून मुभा द्यावी, अशी मागणी बेळगाव शहर, तालुका फोटोग्राफर्स आणि व्हिडीओग्राफर्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मागील वषीही कोरोनामुळे लग्नसराई पूर्णपणे बंद झाली होती. कोणत्याही प्रकारच्या सण-समारंभांवर बंदी असल्यामुळे फोटो काढणे याचप्रमाणे शूटिंग करणे थांबले होते. काही महिन्यांपूर्वी हे काम सुरळीत झाले. त्यानंतर पुढे थोडे काम मिळाले. मात्र, आता पुन्हा विवाह समारंभासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायांवर बंदी घातली आहे. त्यामध्ये फोटोग्राफर्स आणि व्हिडीओग्राफर्स यांचा समावेश आहे. मात्र, आम्हाला अडचणी निर्माण झाल्या आहेत. तेव्हा इतर व्यावसायिकांप्रमाणेच आम्हालाही व्यवसाय करण्यास मुभा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
लग्नसराईनंतर वर्षभर काम कमीच
लग्नसराईमध्येच आमचा व्यवसाय असतो. मात्र दरवषी याचवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आमच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. अनेकांनी कर्जे काढून कॅमेरे व इतर साहित्य घेतले आहे. मात्र, आता ते कर्ज फेडणे अशक्मय झाले आहे. ही लग्नसराई संपल्यानंतर वर्षभर आम्हाला कामच राहणार नाही. तेव्हा आम्ही कोरोनाचे नियम पाळत आमचा व्यवसाय आतापर्यंत करत आलो आहे. यापुढेही करत राहीन. मात्र, आम्हाला व्यवसाय करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डी. बी. पाटील, सुरेश मुरकुंबी, संजय हिशोबकर, गणेश होनगेकर, शेखर आंबेवाडीकर, मंजु कुंदरगी, संतोष पाटील यांच्यासह फोटोग्राफर्स आणि व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.