युक्रेनचे संरक्षण करण्याची घेतली शपथ
ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
आम्ही कोणतीही शस्त्रे ठेवणार नाही. आम्ही आमच्या राज्याचे रक्षण करण्यास समर्थ आहोत, कारण आमची शस्त्रे आमचे सत्य आहेत असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी आपल्या व्हिडीयोद्वारे सांगितले.
युक्रेनच्या सैन्याने शनिवारी त्यांच्या राजधानीवर रशियन हल्ला परतवून लावल्याचे सांगितल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक सेल्फी-शैलीतील व्हिडिओ शूट केला आणि इथेच राहण्याची आणि लढण्याची शपथ घेतली. “मी येथेच आहे. आम्ही कोणतीही शस्त्रे ठेवणार नाही. आम्ही आमच्या राज्याचे रक्षण करू, कारण आमची शस्त्रे हेच आमचे सत्य आहे,” असे त्यांनी जाहीर केले, त्यांनी या व्हिडिओद्वारे शरणागती पत्करली किंवा पळून गेल्याचा दावा खोटा ठरवला.