कोलकाता
आयआयएफएल होम फायनान्स कंपनीला रोखे विक्रीतून 1000 कोटी रुपये उभारण्यासाठी बाजारातील नियामकाने परवानगी दिली आहे. कंपनी 8.25 ते 8.75 टक्के कुपनसह रोखे विक्री करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बिगर परिवर्तनीय रोखे 8 डिसेंबरपासून सबस्क्रिप्शनसाठी खुले होतील. रोख्यांची बेस इश्युची किंमत 100 कोटी असेल. कंपनी दुसऱयांदा रोखे विक्रीची मोहीम हाती घेत असल्याचे सांगण्यात येते.