कलकत्ता विद्यापीठ दुसऱया स्थानावर : बनारस हिंदू विद्यापीठाला तिसरे स्थान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शांघाय रँकिंग कंसल्टन्सीने अकॅडमिक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटी (एआरडब्ल्यूयू) 2021 प्रसिद्ध केले आहे. मानांकन यादीनुसार आयआयएससी बेंगळूरला देशातील सर्वोत्तम विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. तर कलकत्ता विद्यापीठ देशात दुसऱया स्थानावर राहिले आहे. शांघाय रँकिंग कंसल्टन्सीकडून प्रसिद्ध होणारे एआरडब्ल्यूयू मानांकन उच्चशिक्षण संस्थांच्या प्रमुख मानांकनांपैकी एक आहे.
एआरडब्ल्यूयू अंतर्गत दरवर्षी जगातील सुमारे 1 हजार विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांची समीक्षा केली जाते. बनारस हिंदू विद्यापीठाला यंदा तिसरे स्थान मिळाले आहे. तर आयआयटी दिल्ली चौथ्या स्थानावर आहे.
पाचव्या स्थनावर आयआयटी खडगपूर तर मद्रास आयआयटी 6 व्या स्थानी आहे. जेएनयूला सातवा क्रमांक मिळाला आहे. यंदा दिल्ली विद्यापीठाला आठवे स्थान प्राप्त झाले आहे. तर ऑल इंडिया इन्स्टीटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसला 9 वे आणि वेल्लोर इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीला देशात 10 वा क्रमांक मिळाला आहे.
हार्वर्ड विद्यापीठ अव्वल
जागतिक मानांकनात यंदा हार्वर्ड विद्यापीठाला जगातील सर्वोत्तम विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर स्टॅनफोर्ड आणि कॅम्ब्ा्रिज विद्यापीठ हे अनुक्रमे दुसरा तसेच तिसऱया क्रमांकावर आहेत. पहिल्या 10 विद्यापीठांमधील 8 विद्यापीठे अमेरिकेतील तर दोन ब्रिटनमधील आहेत.