प्रतिनिधी /पणजी
इंडिया टेड प्रोमोशन संस्थेतर्फे (आयटीपीओ) आयोजित 40व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोवा राज्याचा कक्ष (पॅव्हेलियन) उभारण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील प्रति÷ित प्रगती मैदानावर आज या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या (डीआयपी) माहिती सहाय्यक, श्रीमती. पूजा पालयेकर धारगळकर यांनी गोवा पॅव्हेलियनचे फीत कापून उद्घाटन केले. यावेळी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाचे (गोवा-आयपीबी) प्रशासकीय अधिकारी श्री. सदाशिव नारायण पंडित, डीआयपी तून माहिती सहाय्यक, कु. रंजना मळीक, गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या (जीटीडीसी) सहाय्यक व्यवस्थापक दीपा सावकार आणि पर्यटन खात्यातील ज्यूलिएट फर्ना?डिस यावेळी उपस्थित होत्या.
हा प्रतिष्ठित व्यापार मेळावा दक्षिण-आशिया प्रदेशातील सर्वात मोठय़ा व्यावसायिक कार्यक्रमांपैकी एक आहे, जो कोविड-19 महामारीच्या उदेकामुळे गेल्या वषी आयोजित होऊ शकला नाही. दरवषी भरणाऱया या मेळाव्याला दिल्लीकर आणि देशभरातून असंख्य लोक भेट देतात.
प्रगती मैदानावरील मोकळय़ा जागेत हॉल क्रमांक 3एफ मध्ये 60 चौरस मीटर क्षेत्रफळावर गोवा पॅव्हेलियन उभारण्यात आला आहे, जो गोव्याच्या वास्तुकलेचे चित्रण, सौंदर्यपूर्ण उपक्रमांचे प्रदर्शन, राज्य सरकारच्या समाजकल्याण योजना दर्शवितो. हा मंडप या वषीच्या आयआयटीएफ च्या “आत्मनिर्भर भारत” (सेल्फ रीलायंट) या विषयावर आधारित आहे, जे नवीन भारताचे लक्ष्य आहे.
माहिती आणि प्रसिद्धी खाते, 14 दिवसांच्या कालावधीत आयआयटीएफ मध्ये गोवा राज्याच्या सहभागासाठी नोडल एजन्सी आहे. या वार्षिक व्यापार मेळाव्यात सहभागी विभाग आणि महामंडळाना स्टॉल उभारण्यासाठी आणि संबंधित क्रियाकलाप आयोजित करण्यासाठी सुविधा आणि समन्वय साधण्यात, डीआयपी महत्त्वाची भूमिका बजावते.
डीआयपी व्यतिरिक्त पर्यटन विभाग, हस्तकला, वस्त्राsद्योग आणि कॉयर विभाग, उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालय, गोवा पर्यटन विकास महामंडळ, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन सुविधा मंडळ आणि गोवा औद्योगिक विकास महामंडळ यासारखे पाच विभाग यात सहभागी झाले आहेत. ऍडव्हर्टायझिंग असोसिएट्स या गोव्यातील नामांकित एजन्सी?नी गोवा पॅव्हेलियन आणि संबंधित उपक्रमांची संकल्पना, रचना, उभारणी आणि व्यवस्थापन करण्याचे काम केले आहे.
या मेळाव्यात दैनंदिन उपक्रमांव्यतिरिक्त गोव्याच्या लोक कलाकारांचे सांस्कृतिक सादरीकरण होइल, ज्यात गोव्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, हस्तकला आणि कारागिरांनी केलेल्या कलाकृतींची विक्री, सांस्कृतिक वारसा याशिवाय, आदरातिथ्य सादर केले जाईल. गोव्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी, येथील औद्योगिक वाढ आणि पर्यटन क्रियाकलापांना मोठय़ा प्रमाणात चालना देण्यास गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
या प्रसंगी, स्वयंपूर्ण गोवा, समृद्ध संस्कृती आणि गोवा मुक्तीची 60 वर्षे यासाठी सरकारने केलेल्या उपलब्धी आणि उपक्रमांचा समावेश असलेल्या माहितीपत्रकाचे गोवा गुंतवणूक, प्रोत्साहन आणि सुविधा मंडळाचे सदाशिव पंडित यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
महत्वाची बाब म्हणजे, गोवा पॅव्हेलियनच्या उद्घाटनापूर्वी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. पियुष गोयल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सहभागी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबतच परदेशातील देशांनी त्यांच्या स्टॉल्सचे उद्घाटन करून लोकांना त्यांच्या स्टॉलला भेट देण्यास वाव दिला. यापूर्वी गोवा पॅव्हेलियनने देशातील लहान राज्यांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी सर्वोत्कृष्ट पॅव्हेलियन म्हणून बक्षिसे जिंकलेली आहेत. हा मेळावा 27 नोव्हेंबर 2021 रोजी संपेल.