इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर या संस्थेमध्ये कॅम्पस इंटरव्हय़ूच्या माध्यमातून 1300 विद्यार्थ्यांना यंदा नोकऱयांच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. हा एक आतापर्यंतचा विक्रम आहे. या 1300 पैकी 1200 ऑफर्स स्वीकारल्या गेल्या आहेत. याशिवाय 156 प्रि प्लेसमेंट ऑफर्सही देण्यात आल्या आहेत.
आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्याला आतापर्यंतचे सर्वात मोठे वेतन पॅकेज 2 लाख 87 हजार 550 डॉलर्सचे मिळालेले आहे. याची किंमत भारतीय रुपात 2 कोटीहून अधिक होते. ही आंतरराष्ट्रीय ऑफर आहे. देशांतर्गत ऑफर्समध्ये सुद्धा सर्वाधिक ऑफर 1.2 कोटी रुपयांची आहे. यंदा आयआयटी कानपूरच्या 49 विद्यार्थ्यांना 1 कोटी किंवा त्याहून अधिक वेतनाची ऑफर मिळाली आहे.
आयआयटी प्लेसमेंट अभियानात अनेक कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यांमध्ये एक्सट्रिया, ईएक्सएल, ग्रेविटॉन, गोल्डमन सॅक्स, आयसीआयसीआय बँक, इंटेल, मायक्रोसॉफ्ट, ओएलए, रुब्रिक, सॅमसंग, क्वॉडय, उबर, टायगर ऍनालिटिक्स इत्यांदींचा समावेश आहे. या जगप्रसिद्ध कंपन्या आहेत. यंदा आयआयटी कानपूरच्या 80 ट्क्क्याहून अधिक विद्यार्थ्यांना नोकऱया मिळाल्या आहेत. यापैकी 69 टक्के विद्यार्थी पदवीधर तर उरलेले पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत.