एनआयआरएफ मानांकन जाहीर : दिल्लीचे मिरांडा हाउस देशातील सर्वोत्तम महाविद्यालय
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी 2021 या वर्षासाठी एनआयआरएफ मानांकन (नॅशनल इन्स्टीटय़ूशनल रँकिंग प्रेमवर्क) जाहीर केले आहे. या मानांकनात आयआयटी मद्रासला पहिले, तर आयआयएससी बेंगळूरला दुसरे तर आयआयटी मुंबईला तिसरे स्थान मिळाले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाउस कॉलेजची सर्वोत्तम महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली आहे. इंजिनियरिंगच्या पहिल्या 10 महाविद्यालयांमध्ये 8 आयआयटी आणि 2 एनआयटीचा समावेश आहे. एम्स दिल्लीला देशातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयाचा मान मिळाला आहे.
विद्यापीठाच्या शेणीमध्ये पुन्हा एकदा आयआयएससी बेंगळूर अग्रस्थानी आहे. त्यानंतर दुसऱया क्रमांकावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आहे. तर बनारस हिंदू विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळविला आहे.
देशातील पहिल्या 10 संस्था
29 सप्टेंबर 2015 रोजी तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी एनआयआरएफ मानांकनाची सुरुवात केली होती. 4 एप्रिल 2016 रोजी पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी शिक्षण मंत्रालय हे मानांकन प्रसिद्ध करते. शैक्षणिक संस्थांना विविध मानदंडांनुसार कामगिरीच्या आधारावर राष्ट्रीय मानांकन दिले जाते. लर्निंग अँड रिसोर्सेस, रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिसेस, ग्रॅज्युएशन आउटकम, आउटरीज अँड इन्क्लूसिविटी आणि परसेप्शनच्या आधारावर गुण दिले जातात.
मानांकनाची शेणी
संशोधन, समग्र, विद्यापीठ, व्यवस्थापन, महाविद्यालय, फार्मसी, मेडिकल, इंजिनियरिंग, आर्किटेक्चर, एआरआयआयए (नवोन्मेषी कामगिरी आणि संस्थांचे अटल मानांकन) आणि कायदा
- एनआयआरएफ पहिले स्थान :आयआयटी मद्रास
- एनआयआरएफ दुसरे स्थान :आयआयएससी, बेंगळूर
- एनआयआरएफ तिसरे स्थान : आयआयटी, मुंबई
- एनआयआरएफ चौथे स्थान : आयआयटी, दिल्ली
- एनआयआरएफ पाचवे स्थान : आयआयटी, कानपूर
- एनआयआरएफ सहावे स्थान : आयआयटी खड्गपूर
- एनआयआरएफ सातवे स्थान : आयआयटी रुडकी
- एनआयआरएफ आठवे स्थान : आयआयटी गुवाहाटी
- एनआयआरएफ नववे स्थान :जेएनयू, दिल्ली
- एनआयआरएफ दहावे स्थान : बीएचयू, वाराणसी
विद्यापीठ शेणी
- आयआयएससी, बेंगळूर
- जेएनयू, दिल्ली
- बीएचयू वाराणसी
इंजिनियरिंग शेणी
- आयआयटी मद्रास
- आयआयटी दिल्ली
- आयआयटी मुंबई
डेंटल शेणी
- मौलाना आझाद इन्स्टीटय़ूट ऑफ डेंटल सायन्सेस, दिल्ली
- डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ.
- सविता इन्स्टीटय़ूट ऑफ सायन्स चेन्नई.
- मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस, उडुपी
फार्मसी शेणी
- जामिया हमदर्द नवी दिल्ली
- पंजाब विद्यापीठ
- नॅशनल इन्स्टीटय़ूट ऑफ
- फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च हैदराबाद
कायदा शेणी
- नॅशनल लॉ स्कुल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळूर
- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली
- नाल्सर युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद
व्यवस्थापन शेणी
- आयआयएम अहमदाबाद
- आयआयएम बेंगळूर
- आयआयएम कलकत्ता
वैद्यकीय शेणी
- एम्स, दिल्ली
- पीजीआयएमईआर, चंदीगड
- सी. मेडिकल कॉलेज, वेल्लोर