मुंबई : आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सला अलीकडे दोन महामार्ग विकास प्रकल्पांचे काम मिळाले आहे. या प्रकल्पांची ऑर्डर प्राप्त झाल्यामुळे शेअरबाजारात कंपनीच्या समभागात 9 टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसून आले. सदरचे दोन प्रकल्प हे आयआरबीला मिळाले असून सदरचे प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येणार असल्याचे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सने स्पष्ट केले आहे. पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमधील दोन रस्ते महामार्ग विकासाच्या प्रकल्पाचे कंत्राट कंपनीला मिळाले असून सदरच्या प्रकल्प विकासासाठी 3 हजार 179 कोटी रुपये खर्च येणार आहे.
Previous Articleअंकित मोहन बाबूमध्ये साकारणार प्रमुख भूमिका
Next Article खेडमध्ये धावला जिल्हय़ातील पहिला टँकर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.